हर हर महादेव चित्रपट वाद🚩

 


हर हर महादेव चित्रपट वाद :छत्रपती संभाजी राजे निर्माता, दिग्दर्शकाला सवाल.





                                    जेथे देशमुख आणि बांदल देशमुख यांचा वाद यात दाखवला आहे जो वाद केव्हाच नाहीये,उलट ही शिवाजी महाराजांची ताकद आहे.वाद कशावर दाखवलाय तर बकऱ्यावर,ज्या मोठ्या घराण्यांनी आपलं आयुष्य दिल,तुम्ही त्यांचे वाद असे दाखवत आहात,हेच नवीन पिढीने घ्यायचे का?असा सवाल संभाजीराजांनी उपस्थित केलाय बाजीप्रभू देशपांडे हे देशमुख यांचे सेवक होते.एक मोठा लढवय्या होता म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याबद्दल कोणी पुरावे मागत नाही,पण बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई ही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध झाली, हा कुठला इतिहास आहे आणि कुठे लिहिलंय असं संभाजी राजे म्हणाले. पाटील हा बलात्कारी दाखवला आहे हा कुठे लिहिलेला इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन पाटील म्हणतो की मी पन्नास नाही तर  साठ बलात्कार केले आहेत हा इतिहास नवीन पिढीणे पाहायचा आहे का?अशा शब्दात संभाजी राजेंनी संताप व्यक्त.

  

हर हर महादेव चित्रपटाला विरोध करणे थांबवेल:छत्रपती संभाजी राजे.

           माझा विरोध निर्माता किंवा दिग्दर्शकाला नाहीये,कुणी काढलाय त्यालाही माझा विरोध नाहीये, ऐतिहासिक मोडतोड करून चित्रपट काढन चुकीचा आहे.माझं सगळं नेत्यांना म्हणणं आहे,की त्यांनी सांगावं हर हर महादेव मध्ये जे दाखवला आहे ते शंभर टक्के सत्य आहे. तर मी लगेच हरहर महादेव चा विरोध करणे थांबवेल, मी एकटा का विरोध करू सगळ्या इतिहासकारांनी आज बोलावं,अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

                                        हरहर महादेव चित्रपट बरोबर आहे असं सांगावं,मी एकही पत्रकार परिषद याबद्दल घेणार नाही,ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत आयुष्यभर पत्रकार परिषद घेणार नाही,तुम्हाला वाटत असेल की, वंशज चुकीचं सांगतोय तर सांगा मी नाही,बोलणार यापुढे स्वराज्याच्या लोकांनी विरोध केला,त्यांना फरपडत नेलं ते दरोडेखोर आहेत का? असं छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले.

टिप्पण्या